विधानसभा निवडणुकीत भाजपचा दबाव चालवून घेणार नाही, मेजर सुधीर सावंत
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जाग कमी दिल्या गेल्या आणि उशिराने उमेदवार जाही केले. त्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा दबाव चालवून घेणार नाही. जिथे आमच्या जागा आहेत आणि शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. त्या जागा आम्हाला दिल्याच पाहिजेत. असा आमचा आग्रह राहणार आहे, असे शिंदे शिवसेना गटाचे नेते, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा आमचीच होती. परंतु दबावामुळे भाजपने ती घेतली आणि साधनसामुग्रीचा वापर करून निवडून आणल्याचा आरोप करीत सावंत यांनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे. www.konkantoday.com