वाशिष्ठी-जगबुडी नदी संगमाच्या खाडीमधील गाळ काढल्यास चिपळूण, खेडच्या पुराचा प्रश्न सुटेल -डॉ. श्रीनिवास वडगबाळकर
वाशिष्ठी नदी आणि जगबुडी नदी जेथे मिळते, त्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. तेथील खाडीतील गाळ निघाल्यास चिपळूण आणि खेडच्या पुराचा प्रश्न सुटू शकतो. ही दोन्ही शहरे समुद्रसपाटीपासून अवघ्या दोन ते पाच मीटर उंचीवर आहेत. वाशिष्ठीचे क्षेत्र ७००० चौरस मीटर तसेच जगबुडीचे क्षेत्र ९००० चौरस मीटर आहे. त्यामुळे या नद्यांतून अतिवृष्टीच्या काळात डोंगर उतारावरील पाणी येवून समुद्राला मिळते. त्यात भरती असली की हे पाणी थांबते. त्यामुळे संगमाच्या ठिकाणचा गाळ काढणे महत्वाचे असल्याचे मत तज्ञ डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी मांडले.जलबिरादरी महाराष्ट्र व चिपळूण न.प. यांच्यावतीने चला जाणू या नदीला अभियान अंतर्गत नदी की पाठशाला या कार्यशाळेच्या सेमीनार व्हॉलमध्ये जलपुजनाने शुभारंभ झाला. यावेळी चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी जलपूजन केले. पह्यिा सत्रात कोकणातील नद्यांची भूरचना या विषयावर बोलताना डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. www.konkantoday.com