रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एका बांगलादेशी नागरिकास अटक
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एका बांगलादेशी नागरिकास अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वीही चिपळूण, सावर्डे परिसरातून चार ते पाच बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. नवी मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने 21 जून रोजी ही मोठी कारवाई केली आहे. बांगलादेशी नागरिक मोहम्मद युनुस यामीन मुल्ला याला गुढे फाटा येथील एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले. आरोपी सुमारे 40 वर्षापासून कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात राहत असल्याचे समोर आले आहे.शुक्रवार, दि. 21 जून रोजी सायंकाळी 5 वाजता चिपळूण तालुक्यातील गुढे फाटा येथे देवळाजवळ बांधकाम सुरु असलेल्या ओंकार अशोक चव्हाण (वय 32 रा. मो.पो. रामपुर, तळेवाडी ता.चिपळूण) यांच्या इमारतीतून बांगलादेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. मोहम्मद युनुस यामीन मुल्ला (वय 53) हा तेथे अवैधरित्या तेथे राहत असल्याची खबर दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.