
राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.महाराष्ट्रातील विद्यमान सरकारची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याआधीच निवडणुका घेऊन नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यात ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो.www.konkantoday.com