रखडलेल्या हायटेक कामाच्या बसस्थानकामुळे चिपळूण आगाराचा कारभार यावर्षीही शिवाजीनगरमधून
तीन वर्षापूर्वी महापुराचा बसलेला जबरदस्त तडाखा आणि रखडलेले हायटेक बस स्थानकाचे बांधकाम यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यातही चिपळूण आगाराचा कारभार शिवाजीनगर बस स्थानकातूनच चालवावा लागणार आहे. तशी तयारी आगार व्यवस्थापनाने केली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणुन मध्यवर्ती बस स्थानकातील ठराविक महत्वाचे विभाग शिवाजीनगर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यानुसार अलिकडे रोकड विभागाचे स्थलांतर करण्यात आले असून उर्वरित विभाग हलविण्यात येणार आहेत.www.konkantoday.com