“रत्नागिरी जिल्हा “पोलीस भरती_2022-2023”

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे करिता पोलीस भरती प्रक्रिया बुधवार दिनांक १९/०६/२०२४ रोजी पासून रत्नागिरी घटकात होणार आहे. राबवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रीयेबाबत केलेले नियोजन आणि इतर बाबींची माहिती देण्याकरिता आज दिनांक १७/०६/२०२४ रोजी दुपारी १३.०० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये भरती संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली व शंकांचे निरसन करण्यात आले. या पत्रकार परिषदेमध्ये खालील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 1) जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख दिली जाईल. 2) काही उमेदवारांना वेगवेगळ्या पदांकरिता एका पेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणी करिता हजर राहण्याची https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx याद्वारे सूचना प्राप्त झाली असेल अश्या उमेदवारांना दुसरी तारीख रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून दिली जाईल.3) नमूद उमेदवारांच्या मैदानी चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या तारखेमद्धे ४ दिवसांचे अंतर राहील व त्याच वेळी पुढील तारखा दिल्या जातील, याशिवाय उमेदवारांना काही अडचण / शंका असल्यास त्यांनी raunak.saraf@mahait.org यावर ईमेल करावा”.4) “पोलीस भरती २०२२ – 20२३ मधे ज्या उमेदवारांनी एका पेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान ४ दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. 5) याबाबत काही उमेदवारांना इतर अडचणी असल्यास त्यांचे निरसन पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी यांचे मार्फत केले जाईल.6) पोलीस भरती २०२२-२०२३ या करीता उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरलेल्या पुरुष व महिला उमेदवारांची यादी खालील प्रमाणे आहे.अ क्र. तपशील1) पोलीस शिपाई पदे १४९ (०५ पदे बॅण्ड्समन)2) चालक पोलीस शिपाई पदे २१3) पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज पुरुष महिला एकूण ५१७४ १६६४ ६८३८4) पोलीस शिपाई बॅण्ड्समन पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज ५२६ ११० 6365) चालक पोलीस शिपाई पदासाठी प्राप्त आवेदन अर्ज ११९१ ४८ 12396) एकूण पोलीस शिपाई/ बॅण्ड्समन/चालक यांचे प्राप्त आवेदन अर्ज संख्या ८७१३7) पोलीस भरतीचे ठिकाण अ. पोलीस भरती करीता येणा-या पुरुष व महिला उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप, 100 मीटर धावणे व गोळाफेक पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदान येथे घेण्यात येणार आहे. आ. पोलीस भरती करीता येणाऱ्या पुरुष व महिला उमेदवारांचे 1600 व 800 मीटर एम.आय.डी.सी. रत्नागिरी येथील मैदानावर घेण्यात येणार आहे.7) दिनांक १९/०६/२०२४ व २०/०६/२०२४ रोजी प्रतिदिनी ३०० उमेदवार व दिनांक २१/०६/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीत प्रति दिनी सुमारे ५०० इतके उमेदवार मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमापे करीता सकाळी ०६.०० वा हजर राहण्यासाठी तयार करण्यात आलेले वेळापत्रक www.mahait.org याच्याकडे देण्यात आलेले आहेत त्यानुसार त्यांच्याकडून उमेदवारांना प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 8) जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होवू शकली नाही तर शनिवार व रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत. 9) उमेदवारांना पोलीस भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास नमूद हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष WhatsApp क्रमांक: ८८८८९०५०२२, पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, दुरध्वनी क्रमांक – ०२३५२-२७१२५७ व ईमेल sp.ratnagiri@mahapolice.gov.in, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांचे कार्यालय, दुरध्वनी क्रमांक – ०२२-२७५६३२५७, ईमेल – ig.kokanrange@mahapolice.gov.in 10) पावसाळ्याचे दिवस असल्याने उमेदवारांनी पावसापासून आपला बचाव करण्यासाठी पुरेसे साहित्य जसे (रेनकोट, छत्री) आपल्या सोबत ठेवावी तसेच उमेदवारांनी स्वतःची कागदपत्रे पावसातून बचावाकरीता वॉटर प्रूफ बॅग वापरावी. 11) उमेदवारांनी कोणत्याही भूल थापांना बळी पडू नये, पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक असणार आहे. तसेच पोलीस भरती प्रक्रिया कालावधीत भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांकडून तसेच बोगस दलालांकडून किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींकडून ओळखीचा गैरफायदा घेऊन व तसे ओळखीचे अगर अन्य प्रकारचे आमिष दाखवून कोणी पैशाची मागणी करत असल्यास किंवा आर्थिक देवाण-घेवाणीचे गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी दिलेल्या पत्त्यांवर समक्ष किंवा दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. पोलीस उप-अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी, सुर्वे सदन, नाचणे रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी. फोन नंबर – ०२३५२-२२२८९३, टोल फ्रि नंबर – १०९८, ईमेल – dyspacbratnagiri@mahapolice.gov.in, पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी, दुरध्वनी क्रमांक – ०२३५२-२७१२५७ व ईमेल sp.ratnagiri@mahapolice.gov.in, रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्ष WhatsApp क्रमांक: ८८८८९०५०२२. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई यांचे कार्यालय, दुरध्वनी क्रमांक – ०२२-२७५६३२५७, ईमेल – ig.kokanrange@mahapolice.gov.inwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button