
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांना दालनाला दरवाजा बसवण्यासाठी निधी अनुपलब्ध
जिल्हा परिषदेच्या योजना विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या दालनाला दरवाजा बसविण्यासाठी निधी अनुपलब्ध असल्याने सहा महिन्यांपासून हे काम पूर्णतः ठप्प आहे.सहा महिन्यापूर्वी लोहार यांच्या दालनाला असलेला दरवाजा तुटलेला आहे. अद्यापही दरवाजा बसविला जात नसून जिल्हा परिषदेने यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले आहे. अन्य अधिकार्यांच्या दालनात उन्हाळ्याच्या कालावधीत तात्काळ एसी बसविण्यात आले आहेत. दरवाजा बसविण्यासाठी सहा महिन्यांची प्रतिक्षा करावी लागत आहे. अन्य अधिकार्यांच्या दालनाची दुरवस्था झाली असून त्याच्या दुरूस्तीसाठी देखील जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.www.konkantoday.com