त्यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही-उद्योगमंत्री उदय सामंत.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यासंदर्भात राज्यसरकार सकारात्मक आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीत सगे साेयऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि त्यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही,अशी ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना प्रवक्ता आ.संजय शिरसाट यांच्यासह रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.www.konkantoday.com