
अभिनेते अशोक सराफ व ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
नाटक करणे खूप कठीण आहे, पण त्याहीपेक्षा ते टिकवणे खूप कठीण असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली. नाट्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही नाटककार गो. ब. देवल स्मृतीदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने यशवंत नाट्यगृहाध्ये पुरस्कार वितरण, कलावंत मेळावा आणि यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल रसिकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना यावेळी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाट्य परिषदेचे तहहयात विश्वस्त शरद पवार, तहहयात विश्वस्त शशी प्रभू, विश्वस्त उदय सामंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल, विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या निमित्ताने ‘नाट्यकलेचा जागर’चे सादरीकरण करण्यात आले.www.konkantoday.com