लांजा येथील प्रगतशील शेतकरी यांच्या बागेत रमले आरबीआय अधिकारी
लांजा येथील प्रगतशील शेतकरी तथा फणसकिंग म्हणून ओळख असणारे हरिश्चंद्र देसाई व त्यांचे पुत्र युवा शेतकरी मिथिलेश देसाई यांच्या फणस बागेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांनी नुकतीच भेटट दिली. यावेळी थेट फसण बाग शेतातील बांधावर जावून त्यांनी देसाई पितापुत्रांसोबत संवाद साधला.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर स्वप्निल कुमार शहानु यांनी लांजा तालुक्यातील झापडे येथील देसाई यांच्या फणस बागेला भेट दिली. मिथिलेश देसाई हे रिझर्व्ह बँकेच्या सहाय्याने कार्बन क्रेडीटसचा पायलट प्रोजेक्ट करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वप्निल कुमार शहानू यांनी फणस बागेला भेट देत फणस रोपांच्या लागवडीपासून प्रक्रिया, उत्पादन आणि उत्पन्नापर्यंत बागेत फेरफटका मारत सविस्तर चर्चा केली. www.konkantoday.com