रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात आशा सेविकांना पुन्हा मिळाली हक्काची जागा
जिल्हा शासकीय रूग्णालयातील आशा सेविकांसाठी ठेवलेली रूम तत्काळ मिळावी यासाठी आशा संघटनांनी जिल्हा आरोग्य अधिकार्यांची भेट घेतली होती. त्यांनीही तत्काळ जिल्हा रूग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी सकारात्मक चर्चा करत ही रूम पुन्हा आशांना मिळवून दिली आहे.
जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांना संघटनेच्यावतीने आशा व गटप्रवर्तक महिलांनी दोन स्वतंत्र निवेदने दिली होती. या प्रसंगी शिष्टमंडळाशी चर्चा करताना डॉ. आठल्ये यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या प्रमुखांपुढे आशा सेविकांची रूम पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा केली. याविषयी अधिष्ठाता यांनीही दूरध्वनीवरून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांना जिल्हा शासकीय रूग्णालयातील रूम आशांसाठी पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे सांगितले. www.konkantoday.com