जोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या पदावरून खालीखेचणार नाही तसेच महाराष्ट्रात सरकार बनवत नाही तोपर्यंत आमचे आत्मे शांत बसणार नाही.- संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ”मोदीजी भटकती आत्मा कुणाचा पाठलाग सोडत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला पदावरून खाली खेचणार नाही, तोपर्यंत आमचे आत्मे शांत बसणार नाहीत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
भटकती आत्माची गोष्ट महाराष्ट्राच्या प्रचारात खूप चालली होती पण आता केंद्र सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार या ज्या अतृप्त आत्मा आहेत. पहिला मोदींनी त्यांच्या आत्म्यांचे समाधान करायला हवे. नरेंद्र मोदींना सर्वात आधी त्या दोन आत्म्यांची शांती करायला पाहिजे. ज्या प्रकारे मंत्रीमंडळात खाते वाटप झाले आहे. त्यामुळे सर्वच आत्मा अतृप्त आहे. आणि आमचं बोलाल तर भटकती आत्मा कुणाचा पाठलाग सोडत नाही. जोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या पदावरून खालीखेचणार नाही तसेच महाराष्ट्रात सरकार बनवत नाही तोपर्यंत आमचे आत्मे शांत बसणार नाही. महाविकास आघाडी महाराष्ट्रात मजूबत आहे. महाविकास आघाडीची मजबूती काय असेल ते या निवडणूकीत दाखवू व महाराष्ट्रात आम्ही सत्ता स्थापन करू”, असे संजय राऊत म्हणाले.
www.konkantoday.com