चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत चिरेखाणीत आढळल्या घातक पदार्थांच्या ७०० गोणी
चिपळूण तालुक्यातील उभळे गावच्या हद्दीत एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायनमिश्रित घातक पदार्थांनी भरलेल्या ७०० गोणी सोमवारी आढळून आल्या. या गोणीमध्ये निळ्या रंगाचा घातक पदार्थ असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून या गोणीवर मातीचा भराव टाकण्यात आला आहे. या प्रकारामुळे ऐन पावसाळ्यात वाहणार्या नदी-नाल्यांच्या बाबतीत धोकादायक स्थिती निर्माण झाली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.कळमुंडी तनाळी जवळच्या व उभळे गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात उघड्या चिरेखाणी आहेत. यातील एक चिरेखाणीत सुमारे सातशे घातक पदार्थांने भरलेल्या गोणी टाकलेल्या दिसून येत आहेत. www.konkantoday.com