रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी रूग्णवाहिका सेवेचा ठेका घेणार्या ठेकेदाराचा ठेका रद्द
रत्नागिरी जिल्ह्यातील कंत्राटी रूग्णवाहिका सेवेचा ठेका घेणार्या ठेकेदाराला एकूण रक्कमेवरील जीएसटी रक्कम न दिल्याने त्याने ठेकाा घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णवाहिका चालकांचे वेतन गेले दोन महिने रखडले आहे. प्रसंगी ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला असून आता नव्याने ठेका निविदा काढण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालकांचे वेतन ठप्प राहणार आहे.
दरम्यान, याविरोधात सर्व रूग्णवाहिका चालकांनी १० जूनपासून रूग्णवाहिका सेवा बंद करण्याचा इशारा दिला असून असे पत्र जिल्हा आरोग्य अधिकार्यांना दिले आहे.
www.konkantoday.com