
आरोग्य कर्मचारी संघटनेची आरोग्य अधिकारी यांचे बरोबर सकारात्मक चर्चा..
आज जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना रत्नागिरी च्या वतीने जिल्हा आरोग्य विभाग येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये साहेब यांचे अध्यक्षते खाली सभा घेण्यात आली या वेळी उपस्थित पदाधिकारी यांचे प्रशासनाचे वतीने मा अध्यक्ष महोदय यानी स्वागत केले विषय पत्रिके प्रमाणे सर्व विषया वर चर्चा करण्यात आली सर्व विषयांवर प्रशासनाचे वतीने आरोग्य अधिकारी व संबंधित टेबलचे कर्मचारी अधिकारी यांनी सकारात्मक उत्तरे दिली भरती प्रक्रिया, पदोन्नती, वेतन, भविष्य निर्वाह प्रकरणे, वैद्यकीय देयके, वेतन दाखला, इन्सेंटीव्ह, प्रवास भत्ता, सर्व्हिस बुक, अशा अनेक विषयांवर चर्चा करून त्या वर समाधान कारक प्रतिसाद मिळाला.. मा जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब व प्रशासनाचे वतीने इतर अधिकारी यांनी उत्तम सहकार्य केले या वेळी जिल्हाअध्यक्ष श्री. परशुराम निवेंडकर सचिव श्री दिपक गोरीवले, उपाध्यक्ष शैलेश वाघाटे कार्याध्यक्ष श्री. मदन जांनवळकर, सहसचिव श्री. विवेक गावडे, सल्लागार श्रीशंकर केतकर, राज्य संघटक श्री. गजानन साळुंखे संघटक श्री. अभय देसाई, श्री.भरत गांधी, वैभव जाधव, श्री. संतोष कदम, प्रसिद्धी प्रमुख श्री. गणेश वाघ, रत्नागिरी तालुका अध्यक्ष दत्तात्रय गोताड इत्यादी उपस्थित होते
www.konkantoday.com