कुवारबाव पत्रकार कॉलनी जवळ उघड्यावरील प्रदूषित कचरा खाऊन गाईचा मृत्यू
कुवारबाव परिसरातील काही बेफिकीर रहिवासी उघड्यावर कचरा टाकत असल्यामुळे पत्रकार कॉलनी नाल्याजवळ प्रदूषित कचरा खाऊन विषबाधा झाल्याने एका गाईचा नाहक मृत्यू ओढवला आहे याच नाल्यातील प्रदूषित पाणी खालील भागात वाहून जात असल्याने तेथील पिण्याच्या पाण्याचे साठे व विहिरी प्रदूषित होऊन पावसाळ्यात रहिवाशांना साथीच्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागणार आहे याबाबत ग्रामपंचायतीने रहिवाशांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे
www.konkantoday.com