
मातोश्री”चा विश्वास अधिक वाढला,पूर्व विदर्भ तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या विभागीय नेते पदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती
लोकसभा निवडणूकीत पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण ताकदीने पूर्ण करून अपेक्षित यश मिळवून दिल्यानंतर “मातोश्री”चा आमदार भास्करराव जाधव यांच्यावरील विश्वास अधिक वाढला असून त्यांना पक्षाने आता पुन्हा त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.पूर्व विदर्भ तसेच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या विभागीय नेते पदी आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांच्याकडे सर्व प्रथम प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती. काही काळानंतर त्यांना पक्षाचे उप नेते पद देण्यात आले. या पदावर देखील त्यांनी उत्तम काम केले.
www.konkantoday.com