श्रमिक सहकारी पतपेढीची खोटे सोने तारण ठेवून १७ लाखांची फसवणूक, सोनाराविरूद्धही गुन्हा दाखल


राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक सहकारी पतपेढीच्या शाखेत २० दिवसांपूर्वी झालेल्या दागिने चोरीचा तपास लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नसताना आता या शाखेत सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून सुमारे १७ लाख ८३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतपेढीच्या सोनारासह अन्य सातजणांविरोधात नाटे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिक सहकारी पतपेढीचे अधिकारी जगन्नाथ देवीदास रायकर (३२, रा. कांचनवाडी, पो. मिठगवाणे) यांनी नाटे पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दाखल केली. ७ ऑगस्ट २०२३ ते १२ जानेवारी २०२४ या कालावधीत गणेश कृष्णा बेहेरे, आकाश कृष्णा खडपे (रा. कुवेशी), संजय नागेश तिवरामकर (रा. पठारवाडी, जानशी) इशा योगेश सुर्वे, योगेश पांडुरंग सुर्वे (रा. तुळसुंदे), अमोल गणपती पोतदार, प्रभात गजानन नार्वेकर (रा.कोल्हापूर) यांनी श्रमिक सहकारी पतपेढीत ५३ तोळे ६५० मिलिग्रॅम वजनाचे खोटे सोने तारण कर्जासाठी ठेवून त्या बदल्यात पतपेढीकडून १७ लाख ८३ हजार ९०० रु. कर्ज घेले.
श्रमिक सहकारी पतपेढीकडून सोने खरे आहे की खोटे याची पडताळणी करण्यासाठी नियुक्त केलेले सोनार संतोष सदाशिव पाटणकर (रा. मिठगवाणे) यांनी हे खोटे आहे, हे माहित असतानासुद्धा खोटे सोने चेक करून ते खरे आहे, अशी पतपेढीला पावती देवून श्रमिक सहकारी पतपेढीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button