वाढीव दराने शिव स्वराज्य प्रतिमांची खरेदी सखोल चौकशीची मागणी
शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाढीव दराने शिव स्वराज्य प्रतिमा विकत घेण्यासाठी ग्रामपंचायतींना भाग पाडण्यात आले. चार हजार रुपयाने प्रतिमा खरेदी न करणार्यांना चौकशी व कारवाईचा धाक दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या शिव प्रतिमा खरेदी प्रकरणाची सखोल चौकशी करावी, जिल्ह्यात कोणकोणत्या पंचायत समित्यांच्या बीडीओंनी खरेदीसाठी ग्रामपंचायतींवर जबरदस्ती केली हे तपासावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
www.konkantoday.com