येथील जनतेचा विश्‍वास सार्थकी लावणार, नुतन खासदार नारायण राणे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक मोठ्या उमेदीने लढवली आणि त्यामध्ये यशस्वीसुद्धा झालोय. खासदार म्हणून या मतदारसंघातील लोकांच्या विश्‍वासाला मी पात्र ठरलोय. येथील जनतेचा विश्‍वास मी सार्थकी लावणार आहे. आता अब की बार विरोधकांना धडा शिकवणार, असा इशारा नवनिर्वाचित खासदार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला. विजयावर भाष्य करताना राणेंनी विरोधकांनाही लक्ष्य केले. ही निवडणूक भाजपच्या विरोधकांना आत्मपरिक्षण करायला लावणारी आहे. या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला देण्यात आला आहे. मी ज्यावेळेस शिवसेनेत होतो तेव्हा रत्नागिरी-सिंधुदुर्गा उबाठाचे वर्चस्व होते. पण आता उद्धव ठाकरे हे निकामी नेते झाले असल्याची टीका राणे यांनी केली.शिव्या देणारा नेता म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विरोधकांनी आमच्यावर टीका करताना वैचारिक पातळी सोडली. या मतदारसंघातील जनतेची दिशाभूल केली. या मतदार संघात आम्हीच विकास केल्याचे भासवले. पण गेल्या दहा वर्षात येथील खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी काय योगदान दिले, असा सवाल राणे यांनी केला. या मतदारसंघातील सोयीसुविधांबद्दल काय केले. हे देखील दाखवून द्यावे. केवळ टीका करायची आणि लोकांकडे मते मागायची. पण या लोकसभा निवडणुकीत येथील सुज्ञ मतदाररांनी त्यांना योग्य दडा शिकवल्याचे राणे यांनी सांगितले.ही लोकसभा निवडणूक आपण लढलो आणि जिंकलो, याचा अत्यानंद आहे. त्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे सर्व पदाधिकारी यांची फार मेहनत आहे. त्यांनी हा विजय खेचून आणला आहे. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनीही चांगले काम केले आहे. पक्षातील सर्वांनीच मला निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. त्यामुळे हे यश मिळाल्याचा आवर्जुन उल्लेख राणे यांनी केला.या निवडणुकीत सोबतचे वातावरण नांदा सौख्यभरे नव्हते, अशी नाराजी नारायण राणे यांनी व्यक्त केली. ज्यांनी या निवडणुकीत दगा-फटका दिलाय, त्यांनाा संधी मिळेल तेव्हा त्यांचे दोष दाखवणार. भाजपच्या उमेदवाराला पाडायचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांचा शोध घेणार असा सूचक इशारा कोणाचे नाव न घेता राणे यांनी दिला. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button