नेत्रावतीमधील प्रवाशाचा छातीत दुखू लागल्याने मृत्यू
रेल्वेच्या नेत्रावती एक्स्प्रेसने प्रवास करणार्या तामिळनाडू येथील तरूणाच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. बी. सुकुमारम (४२, रा. पेरीयार नगर, नॉर्थ विरूता चलम, कडलूर-तामिळनाडू) असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी ४ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास जिल्हा रूग्णालयात घडली. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बी. सुकुमारम व त्याची पत्नी मुंबईहून नेत्रावती एक्स्प्रेसने या दिवशी तामिळनाडू येथे जात होते. संगमेश्वर ते आरवलीदरम्यान त्यांच्या छातीत दुखू लागले. टीसी व प्रवासी डॉक्टर यांनी त्यांना तपासले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर रत्नागिरी येथे उतरून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.www.konkantoday.com