देशातील जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने नाही-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दिल्लीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेत. त्यात विरोधी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मोठं विधान केले आहे.देशातील जनादेश इंडिया आघाडीच्या बाजूने नाही. काँग्रेसनं कधीही एकटे सरकार बनवणार असं म्हटलं नव्हतं. घटक पक्षांना सोबत घेत पुढे जाऊ असं काँग्रेस सांगत होती असं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते सातत्याने लोकसभेच्या निकालात भाजपाचा पराभव झालाय असं चित्र तयार करत आहेत. परंतु भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीएला २९२ जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीकडे एकूण मिळून २३४ जागा आहेत. इंडिया आघाडीत सहभागी सर्व पक्षांच्या जागा मिळून भाजपाच्या मागे आहेत. त्यानंतरही काँग्रेससह विरोधी पक्षातील नेते भाजपाचा पराभव झाला असल्याचं सांगत आहेत. त्यावर अभिषेक मनु सिंघवींना प्रश्न विचारण्यात आला होता.www.konkantoday.com