इगल इन्फ्रा कंपनीमध्ये काम करणार्या तिघा कर्मचार्यांनी महामार्गच्या लोखंडी साहित्यावर मारला डल्ला
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्या इगल इन्फ्रा कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या तीन कामगारांनी महामार्गावरील फरशी तिठा येथे सुरू असलेला रिटेनिंग वॉलच्या कामासाठीचे ६ हजार ६०० रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्यााची घटना २ जून रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी त्या तिघांवर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखलल करण्यात आला आहे.आलम खुरशेद अली शेख (२६, रा. सध्या पेढे, मुळ कोलकाता), नुरआलम हासमद्दीन शेख (२०, सध्या पेढे, मुळ झारखंड), सोलीम रिटी शेख (२६, सध्या पेढे, मुळ कोलकाता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद प्रेमप्रकाश रामाशंकर सिंग कुसवाह (३२, कामथे) यांनी दिली.www.konkantoday.com