६ जूनला रायगडावर भव्य स्वरूपात शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा होणार
दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवरायांचा ६ जून १९७४ ला राज्याभिषेक झाला. थाटामाटात झालेल्या या सोहळ्यातून सार्वभौम राज्य स्थापन झाले. या ऐतिहासिक क्षणाची स्मृती जपणे हे कर्तव्य समजून ६ जूनला रायगडावर भव्य स्वरूपात शिवराज्याभिषेकदिन सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात धाल तलवारींची-युद्धकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहिरांचा- स्वराज्याच्या इतिहासाचा, सोहळा पालखीचा- स्वराज्याच्या ऐक्याचा आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय शिवराज्याभिषेकदिन महोत्सव समितीचे अध्यक्ष संदीप खांडेकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. www.konkantoday.com