राजापूर शहरासह गावागावात भरणारे आठवडा बाजार आता स्थानिक व्यापार्यांना डोकेदुखी ठरतेय
राजापूर शहरासह गावागावात भरणारे आठवडा बाजार आता स्थानिक व्यापार्यांना डोकेदुखी ठरू लागली असून शासनाने या आठवडा बाजाराचे स्वरूप त्वरित थांबवावे अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाने एका निवेदनाद्वारे सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्याकडे केली आहे. दिवसेंदिवस गावोगावी भरणार्या आठवडा बाजाराला येणारे स्वैर स्वरूप स्थानिक व्यापार्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळे स्थानिक व्यापारी मेटाकुटीस आला असल्याची खंत व्यापार्यांनी किरण सामंत यांच्याकडे मांडली आहे.यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, खजिनदार दिनानाथ कोळवणकर, रमेश पोकळे, अनंत रानडे, विनोद पवार, कौशिक संसारे, विजय हिवाळकर, शार्दुल संसारे आदी व्यापारी उपस्थित होते.www.konkantoday.com