मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात पाच कैद्यांनी कट रचून केला खून
मुंबई बॉम्बस्फोट १९९३ च्या साखळी स्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ५९, रा. मस्जिद बंदर, मुंबई) याचा रविवारी सकाळी कळंबा कारागृहात खून करण्यात आला. कळंबा कारागृहातील ५ कैद्यांनी कट रचून ट्रेनेजवरील सिमेंट व लोखंडी झाकण डोक्यात घालून हा निर्घृण खून केला. आंघोळीसाठी मुन्ना खान बसला असता, अत्यंत शांत डोक्याने हा खून करण्यात आला आहे.मोका बंदी बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, मोका बंदी प्रतिक उर्फ पिल्या सुरेश पाटील, मोका बंदी ऋतुराज उर्फ डेज्या विनायक इनामदार, न्यायाधीन बंदी सौरभ विकास सिद, न्यायाधीन बंदी दीपक नेताजी खोत यांच्यावर जुनी राजवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खून सरकारी कामात अडथळा, मारामारीसह त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com