मुंबई-गोवा महामार्गावर वाढते अपघात, परंतु १५ टनी क्रेन उपलब्ध नाही
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणामुळे वाहनचालकांचा प्रवास सुसाट अन आरामदायी झाला असला तरी चौपदरीकरणानंतरही अपघातांची मालिका सुरूच आहे. महामार्गावरील रायगड, रत्नागिरी, सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. महामार्गावरील धोकादायक वळणे व रस्त्यांचा अंदाजच येत नसल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघाताचे सत्र सुरूच असून प्राणांतिक अपघातांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अपघातादरम्यान, अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी महामार्गावर १५ टनी क्रेनच नसल्याची बाब पुढे आली आहे.एकीकडे पनवेलपासून इंदापूरपर्यंतचे चौपदरीकरण रखडतच सुरु आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी सीटीबीसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथील अद्यापही चौपदरीकरण अपूर्णावस्थेत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी दर्जाहीन कामांमुळे अपघातापासून जागोजागी खड्डे पडे असून वाहनचालकांना वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. www.konkantoday.com