नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीमुळे शिळ धरण सुरक्षित, १२ कोटी रूपये खर्च
रत्नागिरी शहरवासियांना पाणीपुरवठा करणार्या शीळ धरणाच्या सांडव्याकडील बाजूला अतिवृष्टीमुळे मागील वर्षी खचलेल्या डोंगराला आता संरक्षक भिंत बांधून पूर्ण करण्यात आली आहे. सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून ३५० मीटर लांब अंतरात आता सिमेंट कॉंक्रीटची संरक्षक भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.शीळ धरणाच्या सांडव्याजवळील बाजूच्या डोंगराला गेल्या दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीमध्ये मोठ्या भेगा जावून काही भाग खचला होता. त्यामुळे धरणाला काही अंशी धोका निर्माण झाला होता. पावसाळ्यात त्यामुळे डोंगराचा मोठा भराव धरणाच्या सांडव्यात येण्याचा धोका होता. दरवर्षी थोडा थोडा भाग खचत असल्याने तो डोंगराचा भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला.या धरणाच्या सांडव्यातून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसवर्ग होतो. परंतु भविष्यात डोंगर खचून सांडव्यामध्ये मलबा आला, तर धरणाला धोका निर्माण होवू शकतो. ही बाब लक्षात घेत खचणारा डोंगर भाग मजबूत करण्यासाठी संरक्षक भिंत उभारणीसाठी प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला होता. शीळ धरण आणखी मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी लक्ष घालण्यात आले.www.konkantoday.com