संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात गव्यांचा उच्छाद
*संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावात गव्याने उच्छाद मांडला असून आंबा, काजूच्या बागांचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे.चाफवली गावातील सुरेश चाळके, प्रकाश चाळके यांच्या चाफनाथ मंदिर परिसरातील आंबा, काजूच्या झाडांचे फार मोठे नुकसान केले आहे. काजूची मोठी झाडे उखडून टाकली आहेत. आंबा कलमांचेही मोठे नुकसान केले आहे. चाफवली गावात तसेच पंचक्रोशीत या गव्यांचा फार त्रास होत आहे. गव्याचा बंदोबस्त करावा आणि नुकसानीचा मोबदला पाहणी करून शासनाकडून त्वरित मिळावा, अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com