बेळगांव-दापोली बसस्थानकातून प्रवास करणार्‍या एका महिला प्रवाशांच्या पर्समधून ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना

बेळगांव-दापोली बसस्थानकातून प्रवास करणार्‍या एका महिला प्रवाशांच्या पर्समधून ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकात गुरूवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. तीन लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात येताच महिलेला धक्का बसला. यानंतर तातडीने बस येथील बस स्थानकातून पोलीस स्थानकात आणण्यात आली. सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतचा अधिक तपशील उपलब्ध होवू शकला नाही.बेळगाव-दापोली बसमधून (एम.एच. ४०/एन ९७३०) एक महिला प्रवासी प्रवास करत होती. ही महिला कराड बस स्थानकात बेळगाव-दापोली बसमध्ये चढली. ही बस येथील स्थानकात दाखल झाल्यानंतर तिने पर्सची तपासणी केली असता ३ लाख रुपये किंमतीचे ५ तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे लक्षात येताच तिला धक्का बसला. ही बाब वाहकाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बस थेट पोलीस स्थानकात आणण्यात आली. बसमधील सर्व प्रवाशांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button