देवरूख येथील शवदाहिनीची एक वर्षापूर्वी उभारणी झाली, सुरू होण्याआधीच मोडतोड

देवरूख शहरातील चर्मालय स्मशानभूमीत १४ लाखांचा निधी खर्च करून वूड फायर शवदाहिनी बसवण्यात आली आहे. काम पूर्ण होवून १ वर्षाचा कालावधी लोटत आला तरी याचे उदघाटन केलेले नाही. उदघाटनापूर्वीच या दाहिनीची मोडतोड सुरू झाल्याचे चित्र आहे. याकडे नगर पंचायतीने लक्ष देणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.मृतदेहाला अग्नी देण्यासाठी लाकडाची गरज असते. भविष्याचा विचार करून देवरूख येथील चर्माल स्मशानभूमीत एक पाऊल पुढे टाकत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत १४ कोटींचा निधी खर्च करून वुड फायर शवदाहिनी बसवण्यात आली आहे. १७ जून २०२३ रोजी या शवदाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. अल्फा इक्विपमेंट मकारपूर बडोदा कंपनीने शवदाहिनी बसवली आहे. १ वर्षाचा कालावधी लोटत आला तरी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. कोट्यवधींची यंत्रणा अक्षरशः धूळखात पडली आहे. उदघाटनापूर्वीच मोडतोड होवू लागल्याचे दिसत आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button