मुख्यमंत्र्यांकडून राऊतांना नोटीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नोटीस पाठवली आहे. संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. याशिवाय सामनातून देखील त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत.पण या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.तीन दिवसात माफी मांगा अन्यथा कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले असा आरोप सामनातून करण्यात आला होता. संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल केला जाईल.www.konkantoday.com