राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रीक बसेससाठी शिवाजीनगर बसस्थानकात चार्जिंग केंद्र
राज्य परिवहन महामंडळाने इंधनाऐवजी इलेक्ट्रीक बसेसचा वापर करण्याच निश्चित केले असताना त्यानुसाार रत्नागिरी विभागात १३३ इलेक्ट्रीक बसेस दाखल होणार आहेत. या बसेस चार्जिंग करण्यासाठी जिल्ह्यात ४ ठिकाणी चाजिर्ंंग केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. त्यात जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणार्या शहरातील शिवाजीनगर बसस्थानकाचाही समावेश आहे. या बसस्थानकाचे सद्यस्थितीत कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असून ते पूर्णत्वास गेल्यानंतर निश्चितपणे बसस्थानकाला नवा लूक मिळणार आहे.www.konkantoday.com