
ग्रामस्थांचा विरोध असलेल्या आणि न्यायप्रविष्ठ बाब असलेल्या लांजा कोत्रेवाडी येथील जागेची लांजा नगरपंचायतीकडून डंपिंग ग्राउंडसाठी खरेदी?
लांजा कोत्रेवाडी येथील ९०% ग्रामस्थांचा कडाडून विरोध असलेल्या आणि न्यायप्रविष्ठ बाब असलेल्या लांजा कोत्रेवाडी येथील जागेची लांजा नगरपंचायतीकडून डंपिंग ग्राउंडसाठी खरेदी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.त्यामुळे यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाचे लांजा शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली आणि माजी शहराध्यक्ष प्रमोद कुरूप यांनी केला असून या विरोधात मंत्रालयात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.लांजा नगरपंचायतीमार्फत कोत्रेवाडी येथे डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित आहे.मात्र ही जागा लोकवस्तीपासून अवघ्या ७० ते ८० मीटरवर इतक्या जवळ असल्याने या डम्पिंग ग्राउंड ला कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता.यासाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषण करण्यात आली होती. नगरपंचायत, जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील सादर करण्यात आली होती .त्यानंतर नगरपंचायतच्या विरोधात लांजा कोत्रेवाडी येथील ग्रामस्थांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.www.konkantoday.com