दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल, तर मुंबई चौथ्यावर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहेयंदाच्या दहावीच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे.कोकण विभाग या निकालात अव्वल ठरला आहे. कोकण विभागात ९९.०१ टक्के निकाल लागला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर आणि तिसऱ्या स्थानावर पुणे विभागाने बाजी मारली आहे. कोल्हापूराचा ९७.४५ आणि पुण्याचा ९६.४४ टक्के निकाल लागला आहे. चौथ्या स्थानावर मुंबईचा विभाग आहे. मुंबई विभागाचा ९५.८३ टक्के निकाल लागला आहे. दहावीचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर आज दुपारी १ वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार आहे.नऊ विभागीय मंडळ निकाल-पुणे….९६.४४%नागपूर …९४.७३%छत्रपती संभाजीनगर …९५.१९.%मुंबई …..९५.८३%कोल्हापूर ….९७.४५.%अमरावती ….९५.५८%नाशिक …..९५.२८%लातूर …..९५.२७%कोकण …..९९.०१%निकालाची ठळक वैशिष्ट्ये-या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.www.konkantoday.com