जेएसडब्ल्यू बंदरातून ऍग्रीकल्चर एक्स्पोर्ट हब बनविण्यासाठीची चाचणी पूर्ण
कोकणला ऍग्रो एक्सपोर्ट हब बनवण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून अपेडा आणि राज्य शासनाच्या मित्र या दोन्ही संस्थांमार्फत प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी अपेडाचे संचालक व तज्ञ अधिकार्यांच्या एका टीमने गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीतील जयगडच्या जेएसडब्ल्यू बंदरातून ऍग्रीकल्चर एक्स्पोर्ट हब बनविण्यासाठीची चाचणी पूर्ण केली आहे.सातत्याने नवीन बदल होत आहेत. अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. शेतकर्यांच्या उत्पन्न वाढावे यासाठी सरकारही विविध योजना, धोरण आखत आहे. सरकारने शेतमालाच्या निर्यातसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी आणि आंब्यासह २० पिकांची निर्यात वाढवणार आहे. शेतमालाची निर्यात दुप्पट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी एक कृषी आराखडा तयार करण्यात येत आहे. दरम्यान, याचा शेतकर्यांना फायदा होण्यासाठी तसेच रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.कृषी निर्यात वाढवण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी २० कृषी उत्पादनांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनांना अधिकचा दर मिळून फायदा होणार आहे.www.konkantoday.com