पालकमंत्री उदय सामंत यांनी विकास कामाचे प्रगतीपुस्तकच जतनेसमोर मांडले, आचारसंहितेनंतर आणखीन विकासकामे सुरू होणार
राज्यातील लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आलेल्या सामंत यांनी नुकतेच विविध विकासकामांचे प्रगतीपुस्तक मांडले. ते म्हणाले, ७७ कोटी रुपये मंजूर असलेल्या जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन महिन्यात इमारत पूर्ण होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातील १०० कोटींच्या प्रशासकीय इमारतींचे काम प्रगतीपथावर आहे. नगर परिषदेची नूतन इमारत अंतिम टप्प्यात आहे. तर रत्नागिरी पंचायत समितीचे नूतन इमारतीचे काम ९० टक्के झाले असून लवकरच ही इमारत पूर्ण होईल असेही ते म्हणाले. रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचे काम सुद्धा येत्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे. तर रहाटाघर बस स्थानकातील कॉंक्रीटीकरणासह इतर काम १५ दिवसात पूर्ण होणार असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जसे मुंबई आणि ठाणे येथे रूग्णालये सुरू झाली आहेत, त्याच धर्तीवर रत्नागिरी नगर परिषदेतर्फे ५० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार असून तेथे केवळ एका केस पेपरच्या आधारावर तपासणी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे लवकरच रत्नागिरी शहरात विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याने रत्नागिरी शहराचे चित्र बदलणार आहे.www.konkantoday.com