आगरदांडा-दिघी पुलामुळे रत्नागिरी, रायगड जिल्हा जोडला जाणार, लवकरच पुलाची निर्मिती
आगरदांडा ते दिघी हे साडेचार किलोमीटरचे अंतर असुन लवकरच या भागात एक मोठ्या पुलाची निर्मिती होणार असून रत्नागिरी व रायगड जिल्हा या पुलामुळे जोडला जाणार आहे. आगरदांडा ते दिघी खाडी पुलासाठी अशोका बिल्डकॉन, टी. एन. टी. इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्यांकडून निविदा सादर झाल्या आहेत. तर आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करीत निविदा अंतिम केल्या जाणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. सध्या श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथून आगरदांडापर्यंत जंगल जेट्टीची सुविधा उपलब्ध असून याद्वारे लोकांची ने-आण केली जाते. परंतु दोन जिल्हे आता कोस्टल हायवेमुळे जोडले जाणार आहेत. www.konkantoday.com