
रत्नागिरी, खेड, दापोली एसटी आगारांना लवकरच मिळणार प्रदूषणमुक्त इलेक्ट्रीक बस
रत्नागिरी, खेड, दापोली एसटी आगारांना लवकरच इलेक्ट्रीक बस मिळणार आहे. प्रत्येक आगाराने ३५ ते ४० टक्के इलेक्ट्रीक बसची मागणी पूर्ण केली असून ती पूर्ण केली जाणार असल्याची ग्वाही विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.इलेक्ट्रीक गाड्यांचे चार्जिंग आगारातच होणार आहे. यासाठी महावितरणच्या उपकेंद्रातून आगारापर्यंत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. रत्नागिरीतील नाचणे उपकेंद्रातून माळनाका येथील विभाग नियंत्रक कार्यालयाच्याा मागील बाजूस असलेल्या चार्जिंग स्टेशनला वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. www.konkantoday.com