रत्नागिरी शहरात किटकजन्य आजार रोखण्याचे रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान
किटकजन्य आजारापासून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना रत्नागिरी पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. शहरातील कीटकजन्य आजार रोखण्याचे आणखी एक आव्हान नगर पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आले आहे. किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांनी डास प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. किटकजन्य आजारापासून संरक्षण व्हावे, यासाठी शौचालयाच्या व्हॅट पाईप, आऊटलेटला जाळ्या बसवाव्यात, भंगार साहित्याची विल्हेवाट लावावी, डासांच्या नियंत्रणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत, पाण्याची भांडी धुवून कोरडी करून वापरावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळला जावा, असे आवाहन पालिकेच्याा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. तुंबलेली गटारे, नाले, यांच्या साफसफाईवर नगर पालिकेने सर्वाधिक भर दिला आहे. किटकजन्य आजार रोखण्याची जबाबदारी नगर पालिकेने सर्वसामान्य नागरिकांवर सोपवली आहे. आजाराचे वाढते प्रमाण कमी होण्याची नगर पालिकेकडून कोणतीही विशेष खबरदारी घेतली जाणार नाही. www.konkantoday.com