
अनधिकृत जाहिरातीबाबत नगर परिषदेच्या नोटीसीला केराची टोपली
चिपळूण शहरातील मुख्य भागांसह इमारतींवर अनधिकृत उभारलेल्या मोठमोठ्या जाहिराती फलकांच्या १९ मालकांना नगर परिषदेने नोटीस धाडून २४ तासात फलक काढण्याच्या सुचना केल्या आहेत. मात्र ही मुदत टळून गेली तरी एकही फलक काढण्यात न आल्याने संबंधित मालकांनी या नोटीसीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे प्रशासन आता काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.गेल्या काही वर्षापासून शहरातील चिंचनाका, मार्कंडी, काविळतळी, भोगाळे, जुना बसस्थानक, बाजारपूल, बहाद्दूरशेखनाका, पावरहाऊस आदी ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक लावले जात आहेत.www.konkantoday.com