संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक येथे भरदिवसा घरफोडी
संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रूक तेली तांबटवाडी येथे घरफोडी करून चोरट्याने सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार राजाराम विठू चौगुले (६२, रा. निवेबुद्रूक, तेली तांबटवाडी) यांनी फिर्याद दिली. राजाराम चौगुले हे मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. मोलमजुरी करण्यासाठी नेहमीप्रमाणे पत्नीसोबत ते शनिवारी सकाळी घर बंद करून गेले होते.www.konkantoday.com