आता आमदार बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरला आता तरी जागा हो असं म्हणत एक बातमी पोस्ट केली

सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगर मध्ये वास्तव्यास असलेल्या प्रकाश गोविंदा कापडे वय 37 यांनी गेल्या आठवड्यात बुधवारी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली.ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातूनच त्यांनी स्वत:ला संपवल्याचं प्राथमिक कारण समोर आलं आहे. आता या प्रकरणावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरचं नाव घेत पोस्ट केलीय.सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक असणाऱ्या प्रकाश गोविंदा कापडे याच्या आत्महत्या प्रकरणावरून आता आमदार बच्चू कडू यांनी थेट सचिन तेंडुलकरला आता तरी जागा हो असं म्हणत एक बातमी पोस्ट केलीय. प्रकाश कापडे याने ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनामुळे आत्महत्या केली, त्याच ऑनलाइन गेमिंगची जाहिरात सचिन करतोय. त्याने भारतरत्न पुरस्काराची मर्यादा न पाळता जाहिरात सुरू ठेवली. आता अंगरक्षकाने जीवनं संपवले. सचिन तुझा निषेध असो, आता तरी जागा हो… असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button