पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने केलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने केलेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. ही घटना शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर येथे घडली. ब्रह्मा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चर या कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल हा आपली आलिशान कार बेदरकारपणे चालवत असताना रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. येरवडा येथील वेदांत अग्रवाल (रा. ब्रह्मा सन सिटी) याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अनीस अवलिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला.