मोबाईल शॉपीतील चोरीमुळे परप्रांतीय कामगार नोंदणीबाबत गुहागर पोलीस आग्रही
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे नुकत्याच झालेल्या मोबाईल शॉपी चोरीप्रकरणी अजून तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर गुहागर पोलीस अलर्ट झाले असून त्यांनी काही मार्गदर्शक सूचना स्थानिक व्यापारी, नागरिक, व्यावसायिक यांना केल्या आहेत. यामध्ये परप्रांतीय कामगारांची नोंदणी पोलीस स्थानकात करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी केले आहे.तालुक्यातील शृंगारतळी येथे परप्रांतीय तसेच बाहेरील जिल्ह्याातील कामगार मजूर चिरेखाण, चायनीज सेंटर, हॉटेल, बागायती याठिकाणी कामासाठी संबंधित मालक-चालकांकडून ठेवले जातात. त्यांची चारित्र पडताळणी केलेली आढळून येत नाही. तसेच त्यांचा पूर्वइतिहास न पाहता त्यांना कामावर ठेवले जाते. www.konkantoday.com