
गोडबोले क्लासेस”चे मुख्य संचालक अमेय गोडबोले यांना बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करणाऱ्या ”गोडबोले क्लासेस”चे मुख्य संचालक अमेय गोडबोले यांना बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गोवा येथे २६ मे रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार आणि केंद्रीय मंत्री यांचे अभिनंदन पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. गेली १२ वर्षे गोडबोले क्लासेसने सातत्याने शैक्षणिक दर्जा टिकविला आहे. याच कार्याची दखल घेऊन गोडबोले यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.