भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकीत नीरज चोप्रायाने सुवर्णपदक पटकावले
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेकीत बाजी मारली. नीरज २०१७ मध्ये शेवटचा भुवनेश्वर येथे स्पर्धेत उतरला होता आणि त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ८५.२३ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात ८२ मीटर आणि तिसऱ्या प्रयत्नात ८१.२९ मीटर लांब भालाफेक केला. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ८५ मीटर लांब भालाफेक पात्रता होती. नीरजने चौथ्या प्रयत्नात ८२.२७ मीटर लांब फेक करून आघाडी घेतली. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता आधीच निश्चित केली आहे, परंतु आज तो ९० मीटर मार्क पार करेल अशी सर्वांना आशा होती. मात्र, त्याने ८२.२७ मीटरसह सुवर्ण नावावर केले. दीपी मान ( ८२.०६ मी.) आणि उत्तम ( ७८.३९ मी.) यांनी अनुक्रमे रौप्यपदक व कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारताचा दुसरा भालाफेकपटू किशोर जेना हा ७५.४९ मीटरसह अव्वल तीन क्रमांकाच्या बाहेर राहिला.