जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पावसाळी हंगामात म्हणजे २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश
जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पावसाळी हंगामात म्हणजे २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी एस. व्ही. भुजबळ यांनी दिले आहेत.याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य बंदर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्याचेही निर्देश प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक व सहायक बंदर निरीक्षकांना दिले आहेत.दरम्यान, सध्या सागरी हवामान चांगले आहे. त्यामुळे जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतुकीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. सरसकट आदेश, नियमामुळे सागरी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. दरवर्षी १० जूनपर्यंत सागरी पर्यटनासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर भेट देतात. किनारपट्टीवरील वातावरणाचा विचार करता २६ ते ३१ मे अशी पहिल्या टप्प्याची, तर सागरी हवामान चांगलेअसल्यास १ ते १० जूनपर्यंत दुसऱ्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी. १० जूननंतर सरासरी पाऊस सक्रिय होतो. या पूर्वीही सागरी पर्यटनाला मुदतवाढ मिळाली आहे. जलक्रीडा व किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक करत आहेत.,www.konkantoday.com