महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने एका माजी पत्रकाराला केली अटक
मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना धमकी दिली. तसेच त्यांची बदनामी केली. देवेंद्र फडणवीस ड्रग माफियांना मदत करतात आणि ते ड्रग माफियांवर कठोर कारवाई करत नाहीत, असा आरोप देखील केतन तिरोडकर यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.मुंबई गुन्हे शाखेने केतन तिरोडकर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.