मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा-गुरववाडी येथे मातीने भरलेला डंपर टेम्पोवर उलटला
मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा-गुरववाडी येथे मातीने भरलेला डंपर टेम्पोवर उलटण्याची घटना घडली आहे हातखंबा-गुरववाडी येथे उतारात रस्त्याचे काम करणारा मातीने भरलेला डंपर रत्नागिरीकडून मिरज येथे जाणार्या टेम्पोवर पलटी झाला. यामध्ये टेम्पोचा किनर गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली आहे. हातखंबा उतारात मातीने भरलेला टेम्पो पाली-मिरजकडे जाणार्या टेम्पोवर उलटला घटनेची माहिती मिळताच तत्काळ नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या रुग्णवाहिकेचे चालक गणेश शिवाजी केतकर यांनी तत्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका आणून जखमींना मदत केली. तसेच तेथे जमलेल्या गर्दीलाही बाजूला करून वाहनांना सुरळीत जाण्यासाठी मार्ग मोकळा करुन दिला. टेम्पोचा चालक गणेश चंद्रकांत कोळी, रा. नाचरे, मिरज, जि. सांगली हा थोडक्यात बचावला आहे. दरम्यान डंपरमध्ये प्रमाणाबाहेर दगड भरलेले होते. त्यामुळे दगड कलंडून अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहेwww.konkantoday.com